Laxman Hake : दादा फक्त बारामतीचे नेते नाही तर महाराष्ट्राचे… जास्त निधी एका शहराकडे, तर बाकीच्या… हाकेंचा हल्लाबोल

| Updated on: Nov 26, 2025 | 1:00 PM

महाराष्ट्रात निधी वाटप आणि विकासाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटला आहे. अजित पवारांच्या तुमचं मत, माझा निधी या वक्तव्यावर लक्षमन हाके यांनी एका शहराकडे जास्त निधी वळवल्यास इतरांचा विकास कसा होणार असा सवाल उपस्थित करत टीका केली आहे.

महाराष्ट्रामध्ये निधी वाटप आणि विकासाच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारात तुमचं मत, माझा निधी असे वक्तव्य करत मतदारांना अप्रत्यक्षपणे दम दिल्याचा आरोप होत आहे. तुम्ही मतदानात काठ मारली तर मी निधीत काठ मारेन, असे पवार म्हणाले होते, ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावर लक्षमन हाके यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हाके यांनी सवाल केला की, जर महाराष्ट्रातील बहुसंख्य निधी एकाच शहराकडे वळवला जात असेल, तर बाकीच्या शहरांचा विकास कसा होणार? अजित पवार केवळ बारामतीचे नेते नसून, ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत आणि बारामतीसोबतच इतर शहरांची जबाबदारीही त्यांच्यावर असल्याचे हाके यांनी म्हटले आहे. त्यांनी पवारांच्या वक्तव्यातील भाषेवरही आक्षेप नोंदवला, ती जबाबदार नेत्याला शोभणारी नसल्याचे नमूद केले.

Published on: Nov 26, 2025 01:00 PM