OBC reservation: ओबीसीच्या आरक्षणावरून श्रेयवादाचे राजकारण करणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

OBC reservation: ओबीसीच्या आरक्षणावरून श्रेयवादाचे राजकारण करणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

Nitish Gadge | Updated on: Jul 12, 2022 | 4:29 PM

ओबीसीच्या आरक्षणावर मंगळवारी सकारात्मक निर्णय येईल तसेच या मुद्यावर श्रेयवादाचे राजकारण करणार नाही असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणावर टाईमपास केला असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ओबीसीला आरक्षण मिळण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. यामध्ये आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे श्रेयवादाचा नाही असेही ते म्हणाले. मंगळवारी आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयात सुनावणी […]

ओबीसीच्या आरक्षणावर मंगळवारी सकारात्मक निर्णय येईल तसेच या मुद्यावर श्रेयवादाचे राजकारण करणार नाही असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणावर टाईमपास केला असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ओबीसीला आरक्षण मिळण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. यामध्ये आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे श्रेयवादाचा नाही असेही ते म्हणाले. मंगळवारी आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. 20 तारखेनंतर निवडणूक सुरू होतील त्यामुळे सध्याच काही सांगणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले. हे आरक्षण आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचे असल्याने सर्वच पक्षांचे डोळे न्यायालयाच्या निकालाकडे लागलेले आहे.

Published on: Jul 12, 2022 4:29 PM
Follow Us