शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी… राजकारणातील घडामोडींना वेग
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदार हे बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. ठाकरे गटाने व्हीप जारी करुन तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील 6 खासदारांनी दांडी मारली. या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ९ खासदारांपैकी ६ खासदार हे बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. ठाकरे गटाने व्हिप जारी करून तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील ६ खासदारांनी दांडी मारली. या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला आहे. या निकालानंतर मोठा ट्विस्ट आला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘माझा शिंदे गटात जाण्याचा निर्णय अद्याप मी घेतलेला नाही, तो दोन दिवसांनी मी माझ्या मतदार संघात गेल्यावर घेईन.’ यानंतर ते त्यांच्या पुण्यातील निवासाला पोहचले. ते घरी पोहचल्यानंतर काही वेळातच शिंदे सेनेत मोठी हालचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.
ताज्या माहितीनुसार, शिंदेंच्या सेनेचे नाना भानगिरे ओमराजे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. ते पुण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आता राजकारणात काही मोठे घडणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.
तब्बल २० वर्षांनंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज कोर्टाने दिला आहे. सबळ पुराव्या अभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ‘माफीचा साक्षीदार विश्वासू नसल्याने त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येत नाही,’ असे कोर्टाने म्हटलं. ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता राज्यात राजकीय समीकरणे फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
