Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात… ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदार बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. पक्षाने तातडीची बैठक बोलावून व्हीप जारी केला होता.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदार बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. पक्षाने तातडीची बैठक बोलावून व्हीप जारी केला होता. मात्र या बैठकीला 6 खासदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज कोर्टाने दिला. तब्बल 20 वर्षांनंतर आलेल्या या निकालात कोर्टाने सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नसल्याने त्याच्या जबाबावर शिक्षा देता येत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. निकालानंतर ओमराजे निंबाळकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे त्यांनी कोर्टातील या निर्णयाचा आणि शिंदे गटात जाण्याच कोणताच संबंध नसल्याचं सांगितलं. मात्र चर्चांना उधाण यायाचा तो आलाच… पुढे काय घडणार? या कडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
