PM Modi : मोठी बातमी… मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले ‘वेळ अन् टार्गेट….’

PM Modi : मोठी बातमी… मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले ‘वेळ अन् टार्गेट….’

| Updated on: Apr 29, 2025 | 7:43 PM

मोदींच्या बैठकीत भारताची सुरक्षा भारतीय सैन्याची पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठीची तयारी अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्याच्या तयारी संदर्भात एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली. याबैठकीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यावर आपला विश्वास व्यक्त करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्यासाठी वेळ आणि टार्गेट ठरवा असं म्हणत सैन्याला ग्रीन सिग्नल दिल्याचे पाहायला मिळाले. नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेदेखील हजर होते. तर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित होते. यासह तिनही सैन्य दलाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. यांच्या बैठकीतून ही मोठी बातमी समोर आली आहे.

Published on: Apr 29, 2025 07:43 PM