Beed | भारताचा पराभव झाल्यामुळे बीडमध्ये क्रिकेटप्रेमींकडून टीव्हीची तोडफोड

Beed | भारताचा पराभव झाल्यामुळे बीडमध्ये क्रिकेटप्रेमींकडून टीव्हीची तोडफोड

| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 7:08 PM

पाकिस्तानने दहा गडी राखून भारताला नमवलं. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाला. बीडमध्ये तर क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडला आहे.

बीड : टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी सामना रंगला. या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. पाकिस्तानने दहा गडी राखून भारताला नमवलं. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाला. बीडमध्ये तर क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडला आहे. या क्रिकेटप्रेमींच्या नाराजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याने भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. यावेळी पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. त्यामुळे भारतीयांचा मोठा हिरमोड झाला होता. भारत सामना हरल्यानंतर बीडमधील क्रिकेटप्रेमींकडून मोठी नाराजी समोर आली आहे. बीडमधील क्रिकेटप्रेमींनी थेट टीव्हीच आहे. टीव्ही फोडतानाचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us