India Air Strike on Pakistan : हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त… भारताकडून करारा जवाब, सध्या घडतंय काय?

India Air Strike on Pakistan : हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त… भारताकडून करारा जवाब, सध्या घडतंय काय?

Harshada Shinkar | Updated on: May 08, 2025 | 4:40 PM

पाकिस्तानमधील एअर डिफेन्सवर भारताने हल्ला चढवला आहे. पाकिस्तानमध्ये अनेक भागांमध्ये अनेक शहरांमध्ये जवळपास बारा शहरांमध्ये ड्रोन हल्ले झालेले होते आणि त्यानंतर आता इस्लामाबादमध्ये हवाई हल्ल्याची सूचना देणारा हा सायरन वाजवला जातो.

पाकिस्तानमधल्या भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये आता सायरन वाजू लागले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याचा डाव भारतीय लष्करांना उधळलेला आहे. पाकिस्तानमध्ये सध्या नागरिकांची पळापळ सुरू आहे. पाकिस्तानकडून काल भारताच्या 15 शहरांना लक्ष्य करण्यात येणार होतं, त्यामुळे भारताने आता पाकिस्तानमधल्या अनेक शहरांमध्ये सिस्टीम निकामी केली आहे. भारतीय लष्कराकडून हार्पी ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे. भारतीय लष्कराकडून वापरण्यात आलेल्या हार्पी ड्रोनचा एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट करण्यासाठी वापर केला जातो. पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडीमध्ये आता सायरन वाजत आहेत. हे सायरने हवाई हल्ल्याची सूचना देणारे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानातील 12 शहरात 50 ठिकाणी ड्रोन हल्ले झालेले आहेत. त्यातला पाकिस्तानचा नौदलाचा तळ किंवा लष्करी मुख्यालय असेल यावर सुद्धा हल्ला झाल्याची माहिती मिळतेय.

Published on: May 08, 2025 4:40 PM
Follow Us