महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल…

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल…

| Updated on: Jul 01, 2026 | 11:45 AM

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 1 जुलैपासून नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात केली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 1 जुलैपासून नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत झाल्याने जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्या आहेत. त्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे.

नायरा एनर्जीचे देशभरात 7000 पेक्षा अधिक पेट्रोल पंप आहेत. या सर्व पंपांवर नवीन दर लागू करण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे असू शकतात.

सध्या, मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 111.21 रुपये आहे.  चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर सर्वात कमी म्हणजे 101.54 रुपये प्रति लिटर आहे. तर हैदराबादमध्ये पेट्रोल 115.69 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.  डिझेलबाबत बोलायचे झाल्यास, 89.47 रुपये प्रति लिटरच्या जवळपास आहे.

Published on: Jul 01, 2026 11:45 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us