PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स… IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स… IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

| Updated on: Aug 08, 2026 | 12:47 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IIT दिल्लीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणासोबतच आयुष्यातील आव्हानांवरही महत्त्वाचा सल्ला दिला. जंतरमंतरवरील CJP आंदोलनानंतर त्यांनी तरुणाईशी संवाद साधण्यावर भर दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IIT दिल्लीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणासोबतच आयुष्यातील आव्हानांवरही महत्त्वाचा सल्ला दिला. जंतरमंतरवरील CJP आंदोलनानंतर त्यांनी तरुणाईशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कॅम्पस जीवन आणि प्रत्यक्ष आयुष्यातील फरक समजावून सांगितला.

मोदी म्हणाले की, IITची पदवी एका दिवसात मिळत नाही. विद्यार्थ्यांनी एक-एक विषय आणि प्रोजेक्टवर मेहनत घेतल्यामुळे ते या टप्प्यावर पोहोचले आहेत. याचप्रमाणे जीवनही पुढे जात असते. मोठे आव्हान समोर आले तर घाबरू नका, ते छोट्या भागांमध्ये विभागून त्यावर काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.

मोदींनी सांगितले की, IITच्या परीक्षेला अभ्यासक्रम असतो, मात्र आयुष्याच्या परीक्षेत सर्व काही आऊट ऑफ सिलेब्स असते. कॅम्पस जीवनात अभ्यासक्रम, असाईनमेंट आणि परीक्षा आधीच ठरलेल्या असतात. मात्र, आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स किंवा प्रश्नपत्रिका नसते. अनेकदा खरा प्रश्न कोणता आहे, हेही स्वतःलाच शोधावे लागते. त्यामुळे प्रत्येक दिवस कालपेक्षा चांगला जगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

Published on: Aug 08, 2026 12:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us