Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा यासाठी कार्यकर्त्यांनी ठाण्यातील घोडबंदर रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलीस प्रशासनावर आरोप करत, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा आणि आरोपींना अटक करावी या मागणीसाठी ठाण्यातील घोडबंदर रोडवर कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करत रास्ता रोको केला. आंदोलकांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली आहे.
कार्यकर्त्यांच्या मते, पूर्णेकर यांना अद्याप न्याय मिळालेला नाही आणि खरे सूत्रधार मोकळे फिरत आहेत. अटक केलेल्या पाच आरोपींपैकी काही जण बनावट असल्याचा आरोपही त्यांनी केला. समाजासाठी काम करणाऱ्या प्रदीप पूर्णेकर यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. पोलीस प्रशासन मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करत नसल्याचा आरोप करत, त्यांना जाणीवपूर्वक वाचवले जात असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
जोपर्यंत मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
