आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट… यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है

आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट… यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है

| Updated on: Jun 18, 2026 | 6:58 PM

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत मोठे विधान केले आहे. “यह तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.. आगे आगे देखो होता है क्या,” असे म्हणत त्यांनी आगामी काळात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

प्रकाश सुर्वे यांनी ठाकरे गटातील काही नगरसेवक आणि आमदार भविष्यात फुटू शकतात, असा दावा केला. तसेच अनेक जण संपर्कात असल्याचेही त्यांनी सूचित केले. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाला आणखी धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही भाष्य केले. “शिंदे साहेबांना अनेकांनी हलक्यात घेतले होते. मात्र त्यांनी स्वतःची ताकद दाखवून दिली आहे. पुढच्या पिक्चरचे चित्रही लवकरच स्पष्ट होईल,” असे प्रकाश सुर्वे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

Published on: Jun 18, 2026 6:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us