प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांशी पुन्हा चर्चा करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी आणि त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आपण लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचे लाड यांनी सांगितले. यावेळी उदय सामंतही सोबत असतील. लाड यांनी सांगितले की, सरकारने […]
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांशी पुन्हा चर्चा करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी आणि त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आपण लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचे लाड यांनी सांगितले. यावेळी उदय सामंतही सोबत असतील.
लाड यांनी सांगितले की, सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्यात कुणबी प्रमाणपत्रांशी संबंधित अडचणी दूर करणे, जातपडताळणीच्या प्रक्रियेला गती देणे, तसेच मराठा आरक्षण कक्ष आणि शिंदे समितीसाठी कार्यालय व अधिकाऱ्यांची नेमणूक करणे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, शिष्यवृत्ती आणि आर्थिक विकास महामंडळाच्या निधीसंदर्भातही निर्णय घेण्यात आले आहेत.
Published on: Aug 26, 2026 9:38 PM
Follow Us
