Prashant Koratkar : कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

Prashant Koratkar : कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

| Updated on: Mar 28, 2025 | 2:42 PM

Prashant koratkar Case : प्रशांत कोरटकर याची आज पोलीस कोठडी संपली आहे. त्यानंतर त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

फरार असताना ज्या हॉटेलांमध्ये प्रशांत कोरटकर थांबला होता त्या हॉटेलांना नोटिस दिल्या असल्याचं पोलिसांनी म्हंटलं आहे. प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपली आहे. त्यानंतर त्याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं आहे. कोरटकरच्या बाजूने अॅड. सौरभ घाग हे युक्तिवाद करण्यात येत आहेत. यावेळी पोलिसांनी ज्या हॉटेलांमध्ये प्रशांत कोरटकर थांबला होता त्या हॉटेलांना नोटिस दिल्या असल्याचं कोर्टाला सांगितलं आहे. तसंच फरार काळात कोरटकर याने वापरलेली गाडी देखील आता पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे.

Published on: Mar 28, 2025 02:42 PM