आता ओमराजेंचे निकटवर्तीय… राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान

आता ओमराजेंचे निकटवर्तीय… राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान

| Updated on: Aug 15, 2026 | 12:02 PM

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांना ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग म्हटले आहे. तुळजापूरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वादातून हे वक्तव्य आले आहे. २०२२ मध्ये शिवसेना आमदारांसोबत सुरतवरून परतलेल्या कैलास पाटील यांच्या निष्ठेवर आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, विशेषतः ओमराजे निंबाळकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर.

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यावर ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचा दावा केला आहे. हे वक्तव्य त्यांनी मिश्किलपणे केले असले तरी, यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

तुळजापूर येथे चिनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावरून सुरू असलेल्या वादातून सरनाईकांनी हे विधान केले. कैलास पाटील यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने हे काम सुरू असल्याचा आरोप केला होता, ज्याला प्रत्युत्तर देताना सरनाईकांनी ऑपरेशन टायगरचा संदर्भ दिला. महत्त्वाची बाबत म्हणडे धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीच्या वेळीदेखील प्रताप सरनाईक यांनीच पुढाकार घेल्याचं सांगितलं जातं.  २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले असताना, कैलास पाटील सुरतवरून माघारी फिरले होते. त्यावेळी त्यांच्या निष्ठेची खूप चर्चा झाली होती.

आता पुन्हा एकदा सरनाईकांच्या या वक्तव्याने आणि कैलास पाटील यांचे मित्र ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर, कैलास पाटील यांच्या भूमिकेबद्दल राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. सरनाईक यांनी आम्ही कैलास पाटील यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

Published on: Aug 15, 2026 12:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us