प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. 15 ऑगस्ट ही मराठी शिकण्याची अंतिम मुदत असून, 18 ऑगस्टपासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार, असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. 1989 पासून हा नियम लागू आहे. या नियमाला 36 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही मराठी बोलता येत […]
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. 15 ऑगस्ट ही मराठी शिकण्याची अंतिम मुदत असून, 18 ऑगस्टपासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार, असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
1989 पासून हा नियम लागू आहे. या नियमाला 36 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही मराठी बोलता येत नसेल, तर एक महिना किंवा 100 दिवसांची मुदत का द्यायची, असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता मुदतवाढ नाही, थेट कारवाई अशी भूमिका परिवहन विभागाने घेतल्याचं दिसत आहे.
Published on: Aug 14, 2026 1:51 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
