
Video | संजय राऊत-आशिष शेलार यांच्यात गुप्त बैठक, प्रविण दरेकरांच्या प्रतिक्रियेनंतर गूढ वाढलं
आगामी पावसाळी अधिवेशनाच्या आधी राज्यात बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. सध्या भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते आहे.
मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या आधी राज्यात बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. सध्या भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते आहे. या दोन नेत्यांच्या बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. भाजप कुणालाही ब्लॅकमेल करत नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे, असंही दरेकर यांनी सांगितलं. तसेच शिवसेनेने हात पुढे केला तरी आम्ही विरोधातच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Related Video
400 फूट खोल दरीत ढकलल्यानंतर केतनची बॉडी कशी होती ?
आज होणार सिया गोयल हिचा फैसला, 400 फूट खोल दरीत केतनला ढकलणाऱ्या..
लोणावळ्याला पावसाने झोडपले, 24 तासांत तब्बल 131 मिमी पावसाची नोंद
तैमुरला धर्माबद्दल काय शिकवण देतो, प्रथमच सैफ अली खानकडून खुलासा
केतन अग्रवाल मर्डर केसमध्ये सर्वात मोठा खुलासा... थेट युट्यूबवरच..
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,