अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री…
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर न्यायालयीन प्रकरणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. बॉम्बे हायकोर्टाने प्रीती झिंटाला मोठा दिलासा देत Google LLC, Meta Platforms आणि काही सोशल मीडिया कंपन्यांविरोधात दिवाणी दावा दाखल करण्यास परवानगी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील अनेक संबंधित संस्था आणि व्यक्ती मुंबईबाहेर कार्यरत आहेत. तसेच ऑनलाइन व्यवहार आणि डिजिटल सामग्री विविध ठिकाणांहून प्रसारित करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी बॉम्बे हायकोर्टातच व्हावी यासाठी प्रीती झिंटाने विशेष परवानगी मागितली होती.
या अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी प्रीती झिंटाच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे आता या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे संपूर्ण प्रकरण प्रीती झिंटाच्या व्यक्तिमत्त्व हक्क, कॉपीराइट हक्क आणि तिच्या प्रतिमेच्या गैरवापराशी संबंधित आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले डीपफेक व्हिडिओ, छेडछाड केलेली छायाचित्रे आणि दिशाभूल करणारा डिजिटल मजकूर इंटरनेटवर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.