Prime Minister : पंतप्रधानांनी देशाची संपत्ती मित्रांना वाटली, प्रियंका गांधी यांची मोदींवर टीका

Prime Minister : पंतप्रधानांनी देशाची संपत्ती मित्रांना वाटली, प्रियंका गांधी यांची मोदींवर टीका

| Updated on: Aug 05, 2022 | 7:47 PM

गॅसचा सिलिंडर किती महागला हे दाखवून देतो. दोन-चार लोकं श्रीमंत झाले. त्यांनी महाल बांधले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. परंतु, सामान्य जनता त्रस्त आहे. ज्यांच्याजवळ पैसा आहे, त्यांना महागाई कशी दिसेल, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संपत्ती आपल्या मित्रांना वाटली, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी केली. दिल्लीत आंदोलनादरम्यान त्या बोलत होत्या. प्रियंका गांधी म्हणाल्या, केंद्र सरकारला असं वाटतं की, विरोधी पक्षांना दबावात ठेऊ शकतात. पोलीस फोर्स पाहिल्यानंतर समझौता केला जाईल, असं सरकारला वाटतं असेल. पण, आम्ही एका मिशननं आलो आहोत. सरकारच्या मंत्र्यांना महागाई दिसत नाही. आम्ही पीएम हाऊसपर्यंत जाऊन महागाई दाखवून देतो. गॅसचा सिलिंडर किती महागला हे दाखवून देतो. दोन-चार लोकं श्रीमंत झाले. त्यांनी महाल बांधले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. परंतु, सामान्य जनता त्रस्त आहे. ज्यांच्याजवळ पैसा आहे, त्यांना महागाई कशी दिसेल, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

Published on: Aug 05, 2022 07:47 PM