मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या… DJच्या वादातून विद्यानंद बापटांवर हल्ला; tv9 मराठीच्या कॅमेरा समोरच राडा
पुण्यात गणेशोत्सवातील DJच्या दणदणाटावरून वाद चांगलाच पेटला आहे. DJ समर्थक आणि DJविरोधक असे दोन गट पडले असून, DJविरोधात सातत्याने आवाज उठवणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर आज हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, TV9 मराठीच्या शोमध्ये बोलत असतानाच काही जण अचानक धावत आले आणि विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांकडून आक्रमक वक्तव्य करण्यात आल्याचे बापट यांनी सांगितले. “तुला कोणी ऑब्जेक्शन घ्यायला सांगितलंय... मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या...” अशा शब्दांत हल्लेखोर बोलत असल्याचे फुटेजमध्ये ऐकू येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पुण्यात गणेशोत्सवातील DJच्या दणदणाटावरून वाद चांगलाच पेटला आहे. DJ समर्थक आणि DJविरोधक असे दोन गट पडले असून, DJविरोधात सातत्याने आवाज उठवणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर आज हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे, TV9 मराठीच्या शोमध्ये बोलत असतानाच काही जण अचानक धावत आले आणि विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांकडून आक्रमक वक्तव्य करण्यात आल्याचे बापट यांनी सांगितले. “तुला कोणी ऑब्जेक्शन घ्यायला सांगितलंय… मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या…” अशा शब्दांत हल्लेखोर बोलत असल्याचे फुटेजमध्ये ऐकू येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट पुणे पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी TV9 मराठीशी संवाद साधताना घटनेबाबत माहिती दिली. “तुम्ही साक्षीदार आहात. तुम्हाला माहित आहे. तुम्ही विचारत असताना एक वेडा आला, त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो. पोलीसही तिथे नाहीत हे बघून त्याने हल्ला केला,” असं बापट म्हणाले. हल्लेखोराला सवंग प्रसिद्धी हवी होती, असा आरोपही बापट यांनी केला. दरम्यान, तरुणांकडून गणेशोत्सवातील DJला विरोध करून बापट हे गणेशोत्सवाला विरोध करत असल्याचा दावा केला जात आहे.
यावर उत्तर देताना विद्यानंद बापट यांनी “फुटेज तुमच्याकडे आहे. फुटेज बघून पोलिसांना तुडवून काढू द्या. मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने द्यायचं असतं, गुद्याने द्यायचं नसतं,” अशी भूमिका मांडली. पुढील कारवाई पोलिसांनी करावी, पोलीस आपले काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर पुण्यात गणेशोत्सवातील DJचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, DJ समर्थक आणि विरोधकांमधील वाद आता हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
