Pune | पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर… रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप; काळाबाजारावर अंकूश नाहीच

| Updated on: Mar 17, 2026 | 12:50 PM

पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश पाळले जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. मार्केट यार्ड परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांना रस्त्यावरच गॅस सिलेंडर वाटप केल्याचे पाहायला मिळाले. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुधी यांनी काल गॅस एजन्सींची बैठक घेऊन घरपोच गॅस वितरित करण्याचे निर्देश दिले होते. तरीही काही एजन्सी नियम मोडत रस्त्यावरच सिलेंडर वाटप करत आहेत.

तसेच पुण्याच्या चाकण भागात एचपीसीएल (HPCL) गेटवर गॅसचा काळा बाजार सुरू असल्याचे समोर आले आहे. ट्रकमधून सिलेंडर विक्री करताना हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेत सिलेंडर घेऊन तीन तरुण घटना स्थळावरून पळून गेले आहेत. यामुळे प्रशासन आणि कंपनीच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रत्यक्षात गॅस वितरणाच्या नियमांचे पालन न होणे आणि काळा बाजार यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे, तर प्रशासनावरही कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Published on: Mar 17, 2026 12:50 PM
Follow Us