पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात आता धक्कादायक डिजिटल पुरावे समोर आले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणामुळे गुन्हेगारी जगतात तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या पातळीवर पोहोचला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आरोपी सियाने अधिक दुःखी कसे दिसावे याबद्दल चॅट जीपीटीवर शोध घेतला होता.
पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात आता धक्कादायक डिजिटल पुरावे समोर आले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणामुळे गुन्हेगारी जगतात तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या पातळीवर पोहोचला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आरोपी सियाने अधिक दुःखी कसे दिसावे याबद्दल चॅट जीपीटीवर शोध घेतला होता. ही बाब तपासात उघड झाल्याने प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. या हत्येपूर्वी आरोपींनी राजा रघुवंशी हत्याकांडाचा सखोल अभ्यास केल्याचेही कळते.
केवळ एवढेच नाही, तर चौकशीला कशा प्रकारे सामोरे जावे, याबाबतही त्यांनी ऑनलाइन शोध घेतला होता. पुरावे नष्ट करण्याच्या किंवा तपास भरकटवण्याच्या उद्देशाने हे शोध घेतले असण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, मशरूममधून विष देण्यासह लोकांना भावनिकरीत्या कसे हाताळावे (मॅनिपुलेट करावे) याबाबतही आरोपींनी ऑनलाइन सर्च केल्याचा पोलिसांचा दावा आहे. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
