Murlidhar Mohol | सुप्रिया सुळेंनी पुराव्यासह आरोप करावे - मुरलीधर मोहोळ

Murlidhar Mohol | सुप्रिया सुळेंनी पुराव्यासह आरोप करावे – मुरलीधर मोहोळ

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 31, 2021 | 9:47 PM

प्रचाराला लागा; पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा असेल, असे भाकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यानंतर आता पुण्याचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुळे यांना शुभेच्छा देत टीका केलीय.

पुणे : पुण्यात महानगपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुढील वर्षी फेब्रवारी महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. प्रचाराला लागा; पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा असेल, असे भाकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यानंतर आता पुण्याचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुळे यांना शुभेच्छा देत टीका केलीय. तसेच राष्ट्रवादीने असं काय केलंय की, जनता आम्हाला बाजूला करेल असा सवालदेखील विचारलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us