दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश

दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश

| Updated on: Aug 10, 2026 | 5:11 PM

पुणे जिल्ह्यातील दूध भेसळीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून सांगितल्या जाणाऱ्या सुशांत हिंगे याला अटक करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील दूध भेसळीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून सांगितल्या जाणाऱ्या सुशांत हिंगे याला अटक करण्यात आली आहे. सुशांत हिंगे हा राष्ट्रवादी(अजित पवार) गटाचे जिल्हा परिषद सदस्य विष्णू हिंगे यांचा पुतण्या आहे. या कारवाईनंतर परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

दूध भेसळीच्या प्रकरणात सुशांत हिंगे याच्यासह एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान संबंधित व्यक्तींची भूमिका समोर आली असून, त्यानुसार पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे. दूध भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

दरम्यान, विष्णू हिंगे हे कात्रज संघावर संचालक म्हणूनदेखील काम पाहतात. त्यामुळे सुशांत हिंगे यांच्या अटकेनंतर या प्रकरणाला राजकीय संदर्भही जोडला जात आहे. दूध भेसळीच्या या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका आहे का, याचा तपास सुरू आहे. पुढील तपासात या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Published on: Aug 10, 2026 5:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us