Marathi News Videos Pune News new identity City of bikes How many bikes were sold in the last year in pune

‘दुचाकींचे शहर’ पुण्याची नवी ओळख; पुणेकरांकडे किती दुचाकी वाहनं?
Pune News : पुणे बनलं 'दुचाकींचे शहर'; मागच्या वर्षभरात किती दुचाकी विकल्या गेल्या? आकडेवारी नेमकं काय सांगते? जाणून घ्या...
पुणे : पुणे शहराला आता एक नवी ओळख मिळाली आहे. पुणे बनलंय ‘दुचाकींचे शहर’. पुणे शहरातील एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षातही पुणेकरांचा कल दुचाकी खरेदीकडे जास्त दिसून आला. मागील आर्थिक वर्षात दुचाकी विक्री १ लाख ८५ हजार ६६६ आहे. याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात सुमारे ८५ हजारांनी वाढ झाली आहे. आरटीओ आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये नोंदणी झालेल्या वाहनांची आकडेवारी जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण वाहनांची विक्री १ लाख ७० हजार ५३७ होती. ती २०२२-२३ मध्ये २ लाख ९२ हजार २५९ वर पोहोचली आहे. मागील वर्षभरात वाहन विक्रीत सुमारे १ लाख २० हजारांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे ‘दुचाकींचे शहर’ अशी पुण्याची नवी ओळख निर्माण झाली आहे.
Published on: Apr 04, 2023 10:11 AM
Related Video
Maharashtra News LIVE : पुणे शहरात आजपासून होणार पाणीकपात
रेखाच्या मर्जीशिवाय Kissing सीन, त्या अभिनेत्याच्या मुलीने सोडलं मौन
पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसचे दर होणार कमी, इराण आणि अमेरिका यांच्यात
घाईमुळे होऊ शकतं नुकसान, आज या राशींनी रहा सावध, अन्यथा..
या दिवसापासून महाराष्ट्रात धो धो पाऊस, संकट अजूनही कायम, अरबी समुद्रात
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद