Marathi News Videos PUNE On the birth anniversary of Krantisurya Mahatma Jyotiba Phule, 5000 kg of misal was prepared and distributed in Pune through public participation

ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त पुण्यात अनोखा महोत्सव, बनवली तब्बल ५ हजार किलो मिसळ
VIDEO | महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून तयार केली ५ हजार किलो मिसळ, बघा व्हिडीओ
पुणे : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून पुण्यात ५ हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्यात आले. गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी पहाटे ३ पासून मिसळ करण्याकरिता तयारी सुरु झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजता भव्य अशा कढईमध्ये सर्व पदार्थ आणि मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. ५ हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी ५०० किलो, कांदा ३०० किलो, आलं १०० किलो, लसूण १०० किलो, तेल ३५० किलो, मिसळ मसाला १३० किलो, लाल मिरची पावडर २५ किलो, हळद पावडर २५ किलो, मीठ २० किलो, खोबरा कीस ७० किलो, तमाल पत्र ५ किलो, फरसाण १२०० किलो, पाणी ४००० लीटर, कोथिंबीर ५० जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले.
Published on: Apr 11, 2023 3:22 PM
Related Video
जुलैमध्ये त्रिग्रह योग, 'या' 5 राशींचं फळफळणार नशीब
टीव्ही अभिनेत्याच्या विधानाची चर्चा, म्हणाला की, लग्नानंतर पण...
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
शिंदे गटात जाताच सचिन अहिर ठाकरेंवर बरसले, पहिल्या प्रतिक्रियेत थेट...
भाजप की शिंदे गट, ठाणे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार?
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..