पोलिसात माझी तक्रार घेतली जात नाही, मी आता न्यायालयीन लढाई लढणार; सुषमा अंधारे आक्रमक
उद्धव ठाकरेंच्या पाठीच्या आजारपणामुळे त्यांना बसायची वेगळी व्यवस्था केली होती. आम्ही आमचं बघून घेऊ तुम्ही तुमचं बघा... कालच्या सावरकर गौरव यात्रेत फक्त 83 लोकं आले होते, भाजपकडे कार्यकर्ते राहिले नाहीत का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना विचारला आहे.
पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे मागच्या काही दिवसांपासून संजय शिरसाट यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. आज पुण्यात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. पोलिसात माझी तक्रार घेतली जात नाही, मी आता न्यायालयीन लढाई लढणार आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. संजय शिरसाठ प्रकरणी आता माफी नाहीतर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यासाठी मी 3 रुपयांचा दावा दाखल केलाय. संजय शिरसाठ यांना गल्लीतील कुत्रं तरी ओळखत होतं का? सुषमा अंधारेमुळे त्यांना ओळखायला लागलेत. संजय शिरसाठ जसं बोलतात तो त्यांचा माज आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
Published on: Apr 03, 2023 2:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
