हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता… उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव

हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता… उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव

| Updated on: Jul 03, 2026 | 2:17 PM

पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडून अवघ्या दोन वर्षीय चिमुकल्या सोहम लखन कसबे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, निष्काळजीपणामुळे निष्पाप जीव गेल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

माहितीनुसार, सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी संबंधित ठिकाणी खड्डे खोदण्यात आले होते. मात्र, त्या खड्ड्यांभोवती कोणतीही सुरक्षाव्यवस्था किंवा बॅरिकेड्स उभारण्यात आले नव्हते. सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

याचदरम्यान, घरासमोर खेळत असताना दोन वर्षीय सोहमचा पाय घसरला आणि तो पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला. कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला होता.

या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. सुरक्षा उपाययोजना न करता काम अर्धवट सोडल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू असून, जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Published on: Jul 03, 2026 2:17 PM
Follow Us