Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी संबंध होते, त्याने नकार दिला असेल म्हणून..; हगवणेच्या वकिलाचा धक्कादायक युक्तिवाद

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी संबंध होते, त्याने नकार दिला असेल म्हणून..; हगवणेच्या वकिलाचा धक्कादायक युक्तिवाद

| Updated on: May 28, 2025 | 5:15 PM

Vaishnavi Hagwane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आज आरोपी हगवणे कुटुंबाला शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी हगवणेच्या वकिलाने धक्कादायक युक्तिवाद केलेला आहे.

हुंड्यासाठी सुनेचा छळ करणाऱ्या नराधम हगवणे कुटुंबाने क्रूरतेचा कळस आता केलेला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात आज हगवणे कुटुंबाला शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. यावेळी आरोपींच्या वकिलाने कोर्टासमोर माणुसकीला लाजवेल असा युक्तिवाद केलेला आहे.

न्यायालयात युक्तिवाद करताना हगवणे कुटुंबाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं आहे. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, असा दावा हगवणेच्या वकिलांनी केलेला आहे. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून तिने आत्महत्या केली असेल, असंही वकिलाने म्हंटलं आहे. प्लॅस्टिकच्या छडीने मारण्याला मारहाण म्हणायचं का? असंही युक्तिवाद हगवणेच्या वकिलाकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे सुनेच्या मृत्यूचा कोणताही पश्चाताप नसलेल्या हगवणे कुटुंबाने आता क्रूरतेचा कळस गाठलेला बघायला मिळाला आहे.

Published on: May 28, 2025 05:15 PM