Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
पुणे शहरासह राज्यभरात सध्या पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुणे महानगरपालिका प्रशासनाने सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे
पुणे शहरासह राज्यभरात सध्या पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुणे महानगरपालिका प्रशासनाने सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणेकर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुण्यात चांगला पाऊस पडावा आणि पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे यासाठी सिंहगड रोडवरील श्री विघ्नेश्वर गणेश मंदिरात विशेष पर्जन्ययागाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंदिर परिसरात धार्मिक वातावरण पाहायला मिळाले. अनेक भाविकांनी उपस्थित राहून पावसासाठी प्रार्थना केली.
पुणे शहरातील नागरिकांना पाणी कपातीचा त्रास सहन करावा लागू नये तसेच धरणांमध्ये भरपूर पाणीसाठा निर्माण व्हावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. राज्यात लवकरच मान्सून सक्रिय होऊन समाधानकारक पाऊस पडेल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
