मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी साप; चक्क रेल्वेच्या… पहा व्हिडीओ

मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी साप; चक्क रेल्वेच्या… पहा व्हिडीओ

| Updated on: Jun 24, 2026 | 1:40 PM

मुंबईत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानके आणि रस्त्यांवर नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

CSMT स्थानकावरील एका रेल्वे इंजिनमध्ये अजगराच्या पिल्लाचा शिरकाव झाल्याचे आढळून आले. ही बाब समोर येताच रेल्वे प्रशासनाने तातडीने सर्पमित्रांना पाचारण केले. सर्पमित्रांनी काही वेळाच्या प्रयत्नानंतर इंजिनमध्ये अडकलेल्या अजगराच्या पिल्लाची सुखरूप सुटका केली. या घटनेमुळे स्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

दरम्यान, या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे काल बीकेसी परिसरातही घोणस जातीचे 3 विषारी साप आढळल्याची घटना समोर आली होती. सततच्या पावसामुळे साप सुरक्षित जागांच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अशावेळी नागरिकांनी सावध रहावे असंही सांगण्यात आलं आहे.

Published on: Jun 24, 2026 1:38 PM
Follow Us