US – Iran – Isarel War | लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार? तीन समितीचा वॉच

US – Iran – Isarel War | लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार? तीन समितीचा वॉच

| Updated on: Mar 12, 2026 | 3:22 PM

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतातही जाणवत आहे. महाराष्ट्रात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक आणि व्यवसायिकांना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत आज दुपारी साडेचार वाजता गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या संदर्भात विधानसभेत साडेचार वाजता भाष्य करतील, तर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील.

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतातही जाणवत आहे. महाराष्ट्रात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक आणि व्यवसायिकांना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत आज दुपारी साडेचार वाजता गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या संदर्भात विधानसभेत साडेचार वाजता भाष्य करतील, तर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. या चर्चेत राहुल गांधी कोणते मुद्दे उपस्थित करतात आणि त्यावर हरदीप सिंह पुरी काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तसेच या युद्धजन्य परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली तीन मंत्र्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा समावेश आहे, त्यामुळे या युद्ध परिस्थितीवर ही समिती नजर ठेवणार आहे.

Published on: Mar 12, 2026 03:22 PM
Follow Us