राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप

राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप

| Updated on: Sep 15, 2026 | 2:55 PM

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर UPI शुल्काबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट आकारण्याचा निर्णय अमेरिकेच्या दबावाखाली घेतला जात आहे. यामुळे दुकानदारांवरील शुल्काचा भार अखेर वस्तूंच्या किमतीत वाढ होऊन ग्राहकांकडून वसूल केला जाईल, असे गांधींचे म्हणणे आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) शुल्काबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, मोदी सरकार अमेरिकेच्या दबावापुढे झुकत असून, त्यामुळे 2000 रुपयांवरील मर्चंट UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गांधींनी ट्वीट करत म्हटले आहे की, मोदी सरकारने शांततेत UPI शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आता 2000 रुपयांवरील मर्चंट UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आकारला जाऊ शकतो. असे व्यवहार जरी एकूण UPI व्यवहारांच्या संख्येच्या केवळ 5 टक्के असले, तरी UPI च्या एकूण मूल्यापैकी सुमारे 65 टक्के मूल्य याच व्यवहारांचे आहे.

सरकारने ग्राहकांकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही असे म्हटले असले तरी, दुकानदारांवर लागणारी ही फी वस्तूंच्या किमतीत जोडली जाईल आणि शेवटी ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केली जाईल, असा राहुल गांधींचा दावा आहे. अमेरिकन पेमेंट कंपन्या भारताच्या झिरो-एमडीआर धोरणाला विरोध करत होत्या. US ट्रेड डीलप्रमाणे पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा अमेरिकेच्या दबावापुढे सरेंडर होत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

Published on: Sep 15, 2026 2:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us