Video | शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज! किल्ले रायगडावर ऐतिहासिक 353 व्या राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

Video | शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज! किल्ले रायगडावर ऐतिहासिक 353 व्या राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

| Updated on: Jun 06, 2026 | 10:50 AM

किल्ले रायगडावर शुक्रवारी (दि. 6 मे 2026) मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन आले. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर दुमदुमून गेलंय.

किल्ले रायगडावर शुक्रवारी (दि. 6 मे 2026) मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन आले. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर दुमदुमून गेलंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यास संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शाहाजीराजे उपस्थित आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, कोकण परिक्षेत्राचे पोलीस आयुक्त संजय दराडे आणि रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. रायगडावर सांस्कृतिक कार्यक्रम, शाहिरी आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्त मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील पवित्र नद्यांचं जल रायगडावर आणलं गेलं आहे. त्या जलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येत आहे. या आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.

Published on: Jun 06, 2026 10:50 AM
Follow Us