तो कोण कुरळ्या केसांचा बाबा… राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं…
राज ठाकरे यांनी सरकारी कार्यालयांमध्ये महापुरुषांच्या पंक्तीत पंतप्रधानांचे फोटो न लावण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. पंतप्रधान आणि इतर नेत्यांचे फोटो दुसऱ्या भिंतीवर लावावेत, असे ते म्हणाले. समाजात वाढणाऱ्या धार्मिक उन्मादाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि चुकीच्या कथा सांगणाऱ्या प्रवचनकारांवर जोरदार टीका केली, लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीच चर्चेत असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथे एका कार्यक्रमात सरकारी कार्यालयांमधील फोटो लावण्यावरून आणि देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर महत्त्वपूर्ण भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांसारख्या महापुरुषांच्या पंक्तीत पंतप्रधानाचा फोटो लावणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय त्यांनी आणखी एका विषयावर भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, ‘अनेक प्रवचनकार आणि वक्ते चुकीच्या आणि काल्पनिक कथा पसरवून लोकांची दिशाभूल करत असल्याबद्दलही त्यांनी सडकून टीका केली. तो कोण कुरळ्या केसांचा बाबा… एका प्रसंगाचा उल्लेख करत त्यांनी दाखले दिले की, काही लोक राम आणि रावण युद्धाबद्दल चुकीची माहिती पसरवतात. रावणाला एक लाख पुत्र आणि दीड लाख नातू होते आणि ‘अस्त्रालय’ या शब्दावरून ‘ऑस्ट्रेलिया’ हे नाव पडले, अशा मनघडित कथा सांगून लोकांना कसे संभ्रमात टाकले जात आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. अशा प्रकारच्या बिनबुडाच्या कथांवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन त्यांनी केले.
