राज ठाकरेंनी घेतले बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

राज ठाकरेंनी घेतले बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 10:11 AM

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळताच मनसेप्रमुख राज ठाकरे हे बाबासाहेबांच्या पुण्यातील पर्वती इथे असलेल्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत  मालावली. दरम्यान बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळताच मनसेप्रमुख राज ठाकरे हे बाबासाहेबांच्या पुण्यातील पर्वती इथे असलेल्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us