Marathi News Videos Raj thackeray udhav thackeray unity banner flex in nashik by ubt group bala darade

nashik news
Image Credit source: tv9 marathi
Nashik News : ‘राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या’, ठाकरेंच्या सेनेची नाशकात बॅनरबाजी
Thackeray Brothers Unity : नाशिक शहरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबतचे बॅनर लावण्यात आलेले आहेत.
ठाकरे बंधु एकत्र येण्याबाबत नाशिकमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. ‘राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या’ अशी बॅनरबाजी नाशिक शहरात करण्यात आलेली बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा दराडे यांनी हे बॅनर लावलेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे बंधु एकत्र येण्याबाबत चर्चा होता आहेत. त्यानंतर मुंबईत मनसेकडून देखील अशाच पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आलेली बघायला मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळा दराडे यांनी ‘राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या’ अशी साद उद्धव ठाकरेंना घातली आहे.
Published on: Apr 21, 2025 2:24 PM
Related Video
टाटा मोटर्सची युको बँकेसोबत मोठी भागीदारी; व्यवसाय करणे होणार सोपे
फोनमधील Virtual RAM ही टेक्नॉलॉजीचं काम काय? जाणून घ्या त्याचे 3 फायदे
मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखी १२ एसी लोकल,साध्या लोकल घटल्याने गर्दी
WC 2026 : भारतीय महिला संघ उपांत्य फेरी कसा गाठणार? फक्त तीनच शक्यता
उद्या लोकलचा प्रवास करताना सावध, संडे मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहा
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
नाशिक: चौपदरीकरणात पाइपलाइन फुटली,लासलगावचे दोन दिवसांपासून पाणी बंद
हिंगोलीत पावसाचे धुमशान, बळीराजा सुखावला
मालाडमध्ये स्वस्त ऑफरचा लाभ घेण्यासाठी दुकानाबाहेर तरुणांची प्रचंड गर्दी
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदान
विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा