Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा

Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा

| Updated on: Jul 19, 2026 | 8:40 PM

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या नगरसेविका राजुल पाटील यांनी CJPच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, राजुल पाटील या शिवसेनेत विलीन झालेल्या खासदार संजय दीना पाटील यांच्या कन्या आहेत. आंदोलनादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी CJPच्या आंदोलनाला समर्थन देत युवकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची भूमिका स्पष्ट केली.

राजुल पाटील म्हणाल्या की, “सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके इतका मोठा लढा लढत आहेत. त्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी स्वतः एक युवती आहे आणि युवकांच्या वेदना मला समजतात. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाशी मी एकजूट व्यक्त करते.” दरम्यान, माध्यमांनी त्यांना वडील आणि खासदार संजय दीना पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी त्या विषयावर भाष्य करण्यास टाळाटाळ केली. त्यांनी केवळ आंदोलन आणि युवकांच्या प्रश्नांवरच आपली भूमिका मांडली.

दिल्लीतील आंदोलनाला विरोधी पक्षांकडून वाढता पाठिंबा मिळत असताना, राजुल पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे. युवकांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या या आंदोलनाला पुढील काळात आणखी कोणत्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 19, 2026 8:40 PM
Follow Us