कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता… शिंदे गटातील बड्या नेत्याने सांगितलं त्या भेटीगाठीचं गुपित

कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता… शिंदे गटातील बड्या नेत्याने सांगितलं त्या भेटीगाठीचं गुपित

| Updated on: Jun 22, 2026 | 3:08 PM

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधत ऑपरेशन टायगर पुन्हा यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटातील 6 नव्हे तर 7 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दिल्याचा मोठा दावा त्यांनी केला.

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधत ऑपरेशन टायगर पुन्हा यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटातील 6 नव्हे तर 7 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दिल्याचा मोठा दावा त्यांनी केला. तसेच हे खासदार पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर बंडखोरी स्पष्ट झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ओमराजे निंबाळकर यांना रात्री 2 वाजता काही लोकांनी (ठाकरे गटातील) गुप्त भेट घेतल्याचाही आरोप कदम यांनी केला. मात्र त्यांनी ठाम भूमिका घेतल्याचंही सांगितलं. तसेच संजय राऊत यांच्यावर टीका करत, “ते जितक्या शिव्या देतील तितक्या लवकर पक्ष संपेल,” असंही रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावरही टीका केली. “भास्कर जाधव फक्त काव काव करतात. जर त्यांना भाजपमध्ये मंत्रीपद दिलं तर तेही निघून जातील,” असा टोला त्यांनी लगावला. आज संध्याकाळी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 6 खासदारांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याचाही दावा त्यांनी केला.

Published on: Jun 22, 2026 3:05 PM
Follow Us