Ravindra Chavan : विलासरावांच्या आठवणी पुसण्याचं वादग्रस्त वक्तव्य अखेर रवींद्र चव्हाण यांच्याकडून दिलगिरी, लातूरमध्ये नेमकं म्हणाले तरी काय?

| Updated on: Jan 07, 2026 | 11:10 AM

भाजप नेते रविंद्र चव्हाणांनी लातूर येथील सभेत विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. देशमुख कुटुंबीय आणि विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर, अखेर रविंद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे स्पष्टीकरण दिले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूर येथील एका प्रचार सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरून विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त करत रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. जनक्षोभ वाढत असल्याचे पाहून, अखेर रविंद्र चव्हाणांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांचा उद्देश नवीन विकासात्मक रेकॉर्ड तयार करण्याबद्दल बोलण्याचा होता आणि विलासराव देशमुख यांच्या कार्याबद्दल सर्वांना आदर आहे.

Published on: Jan 07, 2026 11:10 AM