‘महिला म्हणून आदर करतो पण’, मंत्री दादा भुसे यांचा सुषमा अंधारे यांना इशारा

‘महिला म्हणून आदर करतो पण’, मंत्री दादा भुसे यांचा सुषमा अंधारे यांना इशारा

| Updated on: Oct 18, 2023 | 9:28 PM

आम्ही यापुर्वी देखील बोललो आहे की कुठलीही चौकशी करा आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे. तुमच्याकडे काही माहिती असेल तर निश्चित द्या. प्रसिद्धीच्या हव्यासासाठी असं करत आहेत. आम्हालाही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. त्यामुळे अति झालं तर...

मुंबई | 18 ऑक्टोंबर 2023 : ड्रग माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. एकनाथ खडसे यांनी ललित पाटील याची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे. तर, ठकारे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलय. यावरून मंत्री दादा भुसे यांनी सुषमा अंधारे यांना इशारा दिलाय. तो सापडत नव्हता तेव्हा वेगळं बोलत होते. आता सापडला तर काही वेगळे बोलताहेत. तुम्हाला जर इतके ऍडव्हान्स माहित आहे तर ती माहित तुम्ही संबंधित यंत्रणेला का दिली नाही? त्यांच्या पाठीमागचा बोलवतात धनी कोण आहे? प्रसिद्धीसाठी आरोप करायचे ही गोष्ट बरोबर नाही. महिला म्हणून आदर करतो. ही छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिकवण आहे. परंतु जर अति झालं तर कायदेशीर कारवाई करू असा इशारा मंत्री दादा भुसे यांनी दिला.

Published on: Oct 18, 2023 09:28 PM
Follow Us