MNS : राज ठाकरे मेरा क्या XXX… प्ररप्रांतीय रिक्षा चालकाचा मराठी बोलण्यास नकार, आधी मुजोरी अन् जोडले हात…
महाराष्ट्रातच कित्येकदा मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचे समोर आले आहे. कुठे मराठी माणसंच मराठीचा वापर करत नसल्याचे दिसतंय. तर परप्रांतीय लोकं मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झालंय.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यावरून सातत्याने वाद उफाळून येताना दिसत आहे. अशातच परप्रांतीय लोकांकडून मराठी भाषेला विरोध केला जात असल्याचेही पाहायला मिळतंय. या संदर्भातील राज्यातील काही भागातील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यामध्ये एक रिक्षाचालक मराठी बोलण्यास नकार देताना दिसतोय. इतकंच नाहीतर तर राज ठाकरेंवर देखील त्याने भाष्य केले आहे. मराठी भाषा बोलली नाही तर राज ठाकरे मेरा क्या उखाडेगा… असं हा परप्रांतीय रिक्षा चालक बोलत असल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. या सगळ्या प्रकारानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने त्या रिक्षा चालकाला चांगलाच चोप दिला. यानंतर त्याला माफी मागण्यास देखील भाग पाडले.
Published on: Jun 05, 2025 06:50 PM
