Rohit Pawar | राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, योग्य वेळी…

Rohit Pawar | राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, योग्य वेळी…

| Updated on: Feb 17, 2026 | 5:05 PM

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विलीनीकरणासंदर्भात मोठा दावा करत, “माझ्याकडे मोबाईलभर पुरावे आहेत,” असे म्हटले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विलीनीकरणासंदर्भात मोठा दावा करत, “माझ्याकडे मोबाईलभर पुरावे आहेत,” असे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, “एनडीएमध्ये जायचं की बाहेर पडायचं यावर चर्चा झाली होती.” तसेच, विलीनीकरणाच्या चर्चांसाठी ‘दादा’ जयंत पाटील यांच्या घरी भेटायचे, “सीसीटीव्ही तपासा, बैठकांचं सत्य कळेल,” अशी भूमिका त्यांनी मांडली. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. योग्य वेळी आम्ही पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती जनतेसमोर मांडू शकतो.”

दरम्यान, रोहित पवार यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, संभाव्य विलीनीकरणाबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Published on: Feb 17, 2026 04:53 PM