बसू द्या 8-10 दिवस,  CCTV लावा अन्… रोहित पवारांच्या अन्नत्यागावर लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका, म्हणाले, शेतकऱ्यांना…

बसू द्या 8-10 दिवस, CCTV लावा अन्… रोहित पवारांच्या अन्नत्यागावर लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका, म्हणाले, शेतकऱ्यांना…

| Updated on: Jun 13, 2026 | 3:57 PM

आमदार रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर भाजप गोटातून मोठा हल्लाबोल सुरू झाला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी हे आंदोलन नौटंकी असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी तर खवचट टीका केला. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर टीकेची झोड उठवली आहे.

राजकारणात कर्जमाफीचं प्रकरण अजून पेटलेलंच आहे. अशात आमदार रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर भाजप गोटातून मोठा हल्लाबोल सुरू झाला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी हे आंदोलन नौटंकी असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी तर खवचट टीका केला. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर टीकेची झोड उठवली आहे.

पवारांच्या कुटुंबातील माणूस शेतकर्‍यांच्या आंदोलना बसलाय. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की रोहित पवार यांच्या आंदोलन स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि त्यांना आठ-दहा दिवस बसू द्या अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. शेतकऱ्यांच्या पोरांना भाषण करण्याची संधी द्या असं माझं रोहित पवारांना सांगणं आहे, तुमच्याच पक्षाचे प्रतिनिधी टिमकी वाजवणार असतील तर हे आंदोलन म्हणजे आयती गर्दी पाहिजे असेच आहे. विठ्ठलाचा भाविक खूप सुज्ञ आहे, यांनी शेतकरी उध्वस्त केला. कारखाने सहकार मोडीत काढला. तो भंगारमध्ये घातला. शिक्षण संस्थेमध्ये बाय लॉज करून 500 संस्थेच्या बॉडीवर पवार कुटुंबिय आहेत.अशा महाराष्ट्राच्या सातबारा व नाव देणारे पवार शेतकऱ्यांच्या बाजूने उपोषणाला बसणे बकऱ्याच्या लग्नामध्ये येणे आणि अक्षदा टाकणं असे आहे. हे आंदोलन मर्सिडीजला नांगर जुंपण्यासारखंच आहे.

Published on: Jun 13, 2026 3:57 PM
Follow Us