Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले

Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले

| Updated on: Aug 11, 2026 | 1:31 PM

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना केवळ अपघात नसून, “निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून आहे,” असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या घटनेबाबत खंत व्यक्त केली. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आणि प्रशासनाची जबाबदारी यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

विद्यार्थिनींच्या मृत्यूची घटना अत्यंत गंभीर असून, अशा घटनांना केवळ अपघात म्हणून दुर्लक्ष न करता त्यामागील प्रशासकीय हलगर्जीपणाची चौकशी होण्याची गरज असल्याचे रोहित पवार यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Published on: Aug 11, 2026 1:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us