त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत…नेमकं काय घडलं?

त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत…नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 02, 2026 | 4:40 PM

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून आता दुसराच वाद सुरु झाला आहे. या वादाला आता राजकीय आणि कायदेशीर रुप आलं असून प्रकरण प्रचंड तापलंय. महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी एका चर्चासत्रादरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या वक्तव्यांनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी आशा मिरगे यांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, या नोटिसा स्वीकारण्यात आल्या नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर चाकणकर यांनी माझगाव न्यायालयात फौजदारी अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने आशा मिरगे यांना 2 जुलै 2026 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते.

या प्रकरणात आज रुपाली चाकणकर स्वतः माझगाव न्यायालयात हजर झाल्या आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयात पुढे काय घडणार, तसेच आशा मिरगे यांची भूमिका काय असणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 02, 2026 4:40 PM
Follow Us