Sangram Jagtap : अजित पवारांनी नोटीस बजावल्यानंतरही संग्राम जगताप शांत बसेना! हिंदू महिलांवर अत्याचार करणारे म्हणजे…
अजित पवारांची नोटीस मिळाल्यानंतरही संग्राम जगताप यांनी वादग्रस्त वक्तव्ये सुरूच ठेवली आहेत. त्यांनी अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये हिंदू महिला पीडित आणि आरोपी जिहादी असतात असा दावा केला.
अजित पवारांनी नोटीस बजावल्यानंतरही संग्राम जगताप यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबलेली नाहीत. जगताप यांच्या म्हणण्यानुसार, अत्याचाराच्या शंभर टक्के प्रकरणांमध्ये हिंदू महिला पीडित असतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात. त्यांनी हे स्पष्ट केले की, जर शंभर प्रकरणांचा अभ्यास केला तर पीडित महिला हिंदूच आढळतील आणि आरोपी जिहादीच असतील, दुसरे कोणीही आढळणार नाहीत.
तर राजकीय वर्तुळातून येत असलेल्या माहितीनुसार, 2029 च्या निवडणुकीत संग्राम जगताप अजित पवारांच्या पक्षातून नव्हे, तर भाजपमधून निवडणूक लढवतील. त्यांनी आपला नेता बदलला असून, भाजपचे नेते त्यांना पूर्ण पाठबळ देतील कारण ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. केवळ संग्राम जगतापच नव्हे, तर येत्या काळात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदार हळूहळू भाजपमध्ये सामील होतील असा अंदाजही व्यक्त होत आहे.
