ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती

ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती

| Updated on: Jul 19, 2026 | 8:21 PM

गेल्या महिन्यात ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटातील काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चांवर आता शिंदे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय देशमुख म्हणाले की, माझ्या संपर्कात ठाकरे गटातील कोणताही आमदार नाही. आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सुरू असलेल्या राजकीय चर्चांना त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यामागील कारणही सांगितले. मतदारसंघातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. रेल्वे आणि इतर मोठे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित होते, असेही ते म्हणाले.

संजय देशमुख यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत मतदारसंघातील विकासकामांना कोणताही अडथळा येणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. त्यामुळे विकासाला प्राधान्य देत आम्ही निर्णय घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Published on: Jul 19, 2026 7:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us