मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे… शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे… शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

| Updated on: Aug 15, 2026 | 2:53 PM

अलीकडील काही घडमोडी पाहता शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठ्या हालाचली होत आहेत की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनाचं संख्याबळ वाढत असल्यामुळे या दोन्ही मित्र पक्षामध्यो बिनसतंय असं अनेक नेत्यांच्या वक्तव्यामध्ये दिसून आलं. आता या चर्चांमध्ये शिंदेंच्या एका आमदारामुळे भर पडली आहे. 

राज्याच्या राजकारणात मित्र आणि शत्रूची समीकरणे किती वेगाने बदलतात, यावर शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या “मी भोळा राहिलो असतो तर भाजपवाले मला खाऊन टाकतील” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी सर्व शिवसैनिकांना भोळेपणा सोडून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

गायकवाड यांच्या मते, राजकारणात आजचा मित्र कधीही उद्याचा शत्रू होऊ शकतो आणि उद्याचा शत्रू आजचा मित्र बनू शकतो. राजकीय जीवनात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते, त्यामुळे नेहमी सावध राहणे आवश्यक आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जर भोळेपणा केला, तर भाजपनेवाले खाऊन टाकतील मला.” यातून त्यांनी शिवसैनिकांना आपल्या राजकीय भूमिकांबद्दल अधिक जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे. सहकार क्षेत्रात रमेश दादांसारख्या नेत्यांनी भोळेपणाने काम केल्याचे दाखले दिले जातात, पण आजच्या बदललेल्या राजकारणात हा भोळेपणा परवडणारा नाही, असे गायकवाड यांचे मत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत प्रत्येक नेत्याने आणि कार्यकर्त्याने दूरदृष्टीने विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे, कारण राजकारण हे अनिश्चिततेने भरलेले असते.

Published on: Aug 15, 2026 2:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us