Thackeray Brand : थर्ड क्लास बाई… सोडून द्या रे चल…, गोऱ्हेंवर राऊत अन् पेडणेकरांची जिव्हारी लागणारी टीका

Thackeray Brand : थर्ड क्लास बाई… सोडून द्या रे चल…, गोऱ्हेंवर राऊत अन् पेडणेकरांची जिव्हारी लागणारी टीका

| Updated on: Jul 04, 2025 | 2:21 PM

सध्या राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे ब्रँडवरूनही वांदग पाहायला मिळत आहे.

ब्रँड हा शब्द बाजारपेठेतल्या एखाद्या उत्पादनाला वापरतो. राजकारणात चैतन्य निर्माण करणं हे एकद्या नेत्याच्या नेतृत्वावर अवलंबून असतं, परंतू काही प्रश्नांची उत्तरं काळ देईल’, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या आणि ठाकरे ब्रँडवर त्यांनी भाष्य केलं. पुढे त्या असंही म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःची मोहोर ६० आमदार निवडून आणून व्यक्त केली त्याला विरोध करणं म्हणजे मराठी जनतेचा विश्वास चुकीचा ठरवणं त्यामुळे याची जाणीव ठेवावी, असं म्हणत गोऱ्हेंनी निशाणा साधलाय. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांना सवाल केला असताना राऊत म्हणाले कुणाचं नाव घेताय. तर दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांनी निलम गोऱ्हेंना थेट थर्ड क्लास बाई असंच म्हटलंय.

Published on: Jul 04, 2025 02:21 PM