Sanjay Raut | 2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?; संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का?, असा प्रश्न विचारण्यात आला असता संजय राऊत यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “का नाही होऊ शकत? आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रयत्न करू.
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का?, असा प्रश्न विचारण्यात आला असता संजय राऊत यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “का नाही होऊ शकत? आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रयत्न करू.” त्यांनी पुढे सांगितले की, सध्या पक्षावर मोठं संकट आहे आणि फोडाफोडी तसेच पक्षातील नेत्यांची पळवापळवी सुरू आहे. “आम्ही खासदार आहोत का, आमदार आहोत का हे विसरून आधी पक्ष वाचवणं महत्त्वाचं आहे. एक मजबूत संघटना उभी करून पुन्हा जनतेसमोर जाणं आणि सध्याच्या सरकारविरोधात संघर्ष करणं ही आमची प्राथमिकता आहे,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यातून राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत सत्ताधारी पक्षालाही अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
Published on: Mar 27, 2026 10:44 AM
Follow Us
